इंधन अड्यावर पोलिसांचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंधन अड्यावर पोलिसांचा छापा
इंधन अड्यावर पोलिसांचा छापा

इंधन अड्यावर पोलिसांचा छापा

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ९ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील इंधन चोरीच्या अड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. ८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर कारवाई केली आहे.

अमिर मलिक शेख (वय ३२, धंदा ड्रायव्हर रा. कदमवाकवस्ती लोणी काळभोर पुणे, मुळ गाव मु. पो. पिंपळे (आर) ता.बार्शी जि सोलापुर) सचिन भाऊराव सुरवसे (वय ३०, धंदा हेल्पर रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे मुळे रा. भाळवणी, जेऊर ता. करमाळा, जि. पुणे) विजय मारुती जगताप (वय ५२, धंदा व्यवसाय रा. अंबरनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) महेश बबन काळभोर (वय ४२, धंदा शेती रा. कदमवाकवस्ती लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१, वर्षे धंदा ड्रायव्हर रा. संभाजी नगर लोणी काळभोर पुणे) धिरज विठ्ठल काळभोर (वय ३६, धंदा शेती रा. कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे) इसाक इस्माईल मजकुरी (वय ४२ वर्षे धंदा मजुरी रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी / ४०४, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागील जागेत पाच ते सहा जण दोन टँकरमधून चोरून इंधन काढत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलिस पोचले असता इंडियन ऑइल कंपनीच्या दोन टँकरमधून चोरुन पेट्रोल व डिझेल काढत असल्याचे आढळून आले. वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील इंधन भरलेले दोन टँकर, ७ मोबाईल फोन, लोखंडी सळई, चोरलेले इंधन असा ७९ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.