कुंजीरवाडी येथे मित्राचा डोक्यात दगड घालून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंजीरवाडी येथे मित्राचा 
डोक्यात दगड घालून खून
कुंजीरवाडी येथे मित्राचा डोक्यात दगड घालून खून

कुंजीरवाडी येथे मित्राचा डोक्यात दगड घालून खून

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ८ : दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे घडली. अख्तर सय्यद असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. नागझरी, ता. किनवट, जि. नांदेड) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जस्मिन अख्तर सय्यद (वय ३५, सध्या रा. कुंजीरवाडी; मूळ गाव घारगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी अंकुश आणि खून झालेला अख्तर हे सोमवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास कुंजीरवाडी येथे पत्र्याच्या शेडजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत दारू पीत होते. त्यावेळी अंकुश याने अख्तर यांच्या बॅगमधून पैसे काढून घेतले. ते अख्तर यांनी मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो एवढा विकोपाला गेला की अंकुश याने अख्तर यांच्या डोक्यात आणि पायावर दगड मारून त्यांचा खून केला.