लोणी काळभोरला बालदिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी काळभोरला
बालदिन कार्यक्रम
लोणी काळभोरला बालदिन कार्यक्रम

लोणी काळभोरला बालदिन कार्यक्रम

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १५ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोल्डन सियारा पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा केला. संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चंद आणि प्राचार्या प्रीती खनगे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अनेक विद्यार्थी नेहरूंच्या वेशभूषेमध्ये आले होते. यावेळी भाषणे व विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चंद आणि प्रिन्सिपल प्रीती खनगे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी पाटील यांनी आभार मानले.