कवडीपाट परिसरात पोलिसाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवडीपाट परिसरात
पोलिसाला मारहाण
कवडीपाट परिसरात पोलिसाला मारहाण

कवडीपाट परिसरात पोलिसाला मारहाण

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १७ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना शिवागीळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १६) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवेक किशोर साळुंखे (वय २६, रा. साळुंखे वस्ती, मांजरी खुर्द) व मयूर बबन आंबेकर (वय २८) या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाक्याजवळ बुधवारी (ता. १६) पोलिस अंमलदार घनश्याम आडके व बिट मार्शल पोलिस अंमलदारसंदीप धुमाळ हे पेट्रोलिंग करीत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन युवक मोटारसायकलवर मोठमोठ्याने आरडाओरड करत होते. त्या दोघांना, ‘आरडाओरड करू नका, तुमच्या घरी जा,’ असे संदीप धुमाळ यांनी म्हटल्यावर त्या दोघांनी धुमाळ यांना शिवागीळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने हाताने व डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.