किल्ले बनवा स्पर्धेत छत्रपती ग्रुप प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले बनवा स्पर्धेत छत्रपती ग्रुप प्रथम
किल्ले बनवा स्पर्धेत छत्रपती ग्रुप प्रथम

किल्ले बनवा स्पर्धेत छत्रपती ग्रुप प्रथम

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. २२ : संघर्ष प्रतिष्ठान पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत छत्रपती ग्रुप प्रथम क्रमांक पटकविला. तर श्रीरत्न माने याला वैयक्तिक प्रथम क्रमांक मिळाला. केदार जाधव, साहिल खलसे, आर्यन कांचन, प्रतीक भोंगळे, ओम लोखंडे यांनाही विजेते क्रमांक मिळाले. या स्पर्धेत दोनशे ते अडीचशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या प्रागंणात शनिवारी (ता. १९) बक्षीस वितरण सोहळा पार पडला. गेली आठ वर्षांपासून दिवाळीमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. संस्थेचे अध्यक्ष निखिल कांचन व शिवाजी नाना कांचन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व अनिरुद्ध पवार लिखित ''जिरेटोप'' हे पुस्तक बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती योगिनी कांचन, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, अखिल भारतीय मराठा महासंघ उपाध्यक्ष सुनील तुपे, शिवाजी कांचन, युवराज ताटे, अरविंद कांचन, शंकर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
संदीप कांचन यांनी प्रस्तावना तर सौरभ जगताप आणि शारिक सय्यद यांनी आभार मानले.
-----------------------------
00373