कोलवडी येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन

कोलवडी येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन

उरुळी कांचन, ता. ११ : कोलवडी (ता. हवेली) येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. पडवळकर यांनी महिलांना व विद्यार्थिनींना आरोग्य विषयी माहिती दिली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी महिलादिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले.
या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश मदने, विनायक गायकवाड, माजी उपसरपंच निर्मला अडसूळ, एल. पी. भालसिंग, एम. एस. थोरात, एस. के. गायकवाड, व्ही. के. इरणक, एस. एस. आढाव, एन. ए. लिमगुडे, कविता पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हारी थोरात यांनी तर आभार निलम लिमगुडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com