सोरतापवाडी येथे महिलांसाठी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोरतापवाडी येथे महिलांसाठी व्याख्यान
सोरतापवाडी येथे महिलांसाठी व्याख्यान

सोरतापवाडी येथे महिलांसाठी व्याख्यान

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १७ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतच्यावतीने महिला दिन साजरा केला. यावेळी नवजात मुलींना जन्म देणाऱ्या मातांना पौष्टिक आहाराचे किट वाटप करून त्यांचा सत्कार केला. तसेच किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. याप्रसंगी महिला दिनानिमित्त डॉ. चंदा वेदपाठक यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या पूनम चादर, स्नेहल चौधरी, मनिषा चौधरी, सुनीता चौधरी, सुप्रिया चौधरी, सोनाली लोंढे, अश्विनी शेलार, माजी सरपंच पूनम चौधरी, डॉ. माधवी चौधरी, डॉ. चंदा वेदपाठक, शीतल चौधरी तसेच सर्व अंगणवाडी सेविका व महिला उपस्थित होत्या.

सोरतापवाडी (ता. हवेली) : ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिला.