हिंगणगाव येथील जलसमाधी आंदोलन स्थगित

हिंगणगाव येथील जलसमाधी आंदोलन स्थगित

उरुळी कांचन, ता. २ : खामगाव टेक-हिंगणगाव (ता. हवेली) येथे मुळा मुठा नदीवर पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी खामगाव टेक, टिळेकरवाडीसह इतर गावातील नागरिकांनी महाराष्ट्र दिनी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन गावातील नागरिक २०१३ पासून करत आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावही शासनाकडे पाठविले आहेत. या नियोजित पुलामुळे नगर रोड, सातारा रोड आणि सोलापूर रोड हे तीन महामार्ग कमी अंतराच्या प्रवासाने जोडले जाणार असून जेजुरी, रांजणगाव, मोरगाव, थेऊर आदी तीर्थक्षेत्रे कमी वेळात जोडली जाणार आहेत. पंचक्रोशीतील विद्यार्थी कामगार शेतकरी यांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध होऊन त्यांचा १२ किलोमीटरचा वळसा वाचणार आहे, शासनाने आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली.
अखेर शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे संयोजक, हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्र दिनीच जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, आम्हाला जोपर्यंत निधी मंजूर करून पुलाचा प्रस्ताव मान्य केल्याचे अधिकृत लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.

00817

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com