तरुणांवर ज्ञानदानाचे संस्कार होणे गरजेचे : शहापूरकर

तरुणांवर ज्ञानदानाचे संस्कार होणे गरजेचे : शहापूरकर

उरुळी कांचन, ता. ४ : ''''जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. सध्या सोशल मीडियाच्या युगातसुद्धा परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. यासाठी तरुणांवर ज्ञानदानाचे संस्कार होणे गरजेचे आहे,'''' असे मत श्रीकृष्ण आध्यात्मिक प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त महंत विद्याधर शहापूरकर यांनी व्यक्त केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्रीकृष्ण मंदिर वर्धापनदिन व सार्वजनिक पंचावतार सोहळा नुकताच साजरा झाला. त्यावेळी उपस्थितीत सदभक्तांना शहापूरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
श्रीकृष्ण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन सोहळा आचार्य, संत, महंत, तपस्विनी, सद्‌भक्त, महिला यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पूजापाठ, स्नान, आरती, महाप्रसादाचे आयोजन श्रीकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प. ई. सुबोधमुनी धाराशिवकर, माजी उपसरपंच दत्तात्रेय कांचन, आबासाहेब कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, संचालक शरद वनारसे, संजय टिळेकर, उत्तम चौधरी, हरिभाऊ कांचन, कोंडिराम चौधरी, विठ्ठल कोलते, बाबासाहेब चौधरी, संजय कांचन, आबा मुरकुटे, असंख्य सद्‌भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com