यशवंतच्या निवडणुकीसाठी
शेतकऱ्यांनी जमविला निधी

यशवंतच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी जमविला निधी

उरुळी कांचन, ता. ११ : ‘‘थेऊर (ता. हवेली) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ताळेबंदास एकही रुपया शिल्लक नाही. त्यामुळे या निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांनी उभा केला पाहिजे, या आमच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी निवडणूक निधी उभा करून पुढाकार घेतला. त्यांनी दिलेली ही रक्कम निवडणूक होईपर्यंत डिपॉझिट राहणार आहे. तसेच, कारखाना सभासदांच्या ताब्यात गेल्यानंतर किरकोळ व्याजासह नव्या संचालक मंडळाने ही रक्कम परत करावी,’’ असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना येथे बुधवारी (ता. ११) विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी गायकवाड बोलत होते. यावेळी शेतकरी सभासद मोरेश्वर काळे, आबा काळे, विठ्ठल काळे, साहेबराव बांगर, पांडुरंग काळे, भाऊसाहेब आवाळे, अण्णासाहेब काळभोर, रमेश कुंजीर, रमेश काळे, वसंत शेवाळे, साहेबराव वाघ व अन्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यन, कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी सभासदांनी ३० लाख रुपयांचा निधी जमा केला असून, तो साखर आयुक्त गायकवाड यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक संजय गोंदे यांच्याकडे शेतकरी सभासदांनी सुपूर्त केला. ‘यशवंत’च्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्नशील असून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य असणार आहे.
- पांडुरंग काळे, शेतकरी सभासद, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com