लोणी, उरुळी, सहजपूरला हातभट्टी दारूवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी, उरुळी, सहजपूरला
हातभट्टी दारूवर कारवाई
लोणी, उरुळी, सहजपूरला हातभट्टी दारूवर कारवाई

लोणी, उरुळी, सहजपूरला हातभट्टी दारूवर कारवाई

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. २७ : अवैधपणे गावठी हातभट्टी दारुची निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांना लोणी काळभोर, उरुळी कांचन (ता. हवेली); तसेच सहजपूर (ता. दौंड) या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्र. दोनने छापा टाकून गावठी हातभट्टी निर्मिती करणारे मालक, कामगार, जागामालक; तसेच गावठी दारुची वाहतूक करणारे, अशा ७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला. गुन्ह्याच्या ठिकाणाहून ८४०० लिटर रसायन व ८०५ लिटर गावठी हातभट्टी दारू, निर्मिती साहित्य व एक तीन चाकी रिक्षा वाहन, असा एकूण ३ लाख ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई शुक्रवारी (ता. २६) व शनिवारी (ता. २७) केली. त्यात निरीक्षक तानाजी बी. शिंदे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, बी. बी. नेवसे, तसेच जवान किशन पावडे, गणेश वाव्हळे, कल्लेश्वर मुस्तापुरे व वाहनचालक अभिजित सिसोलेकर यांनी केली.