ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १ : संत तुकाराम महाराज पालखी ही पूर्व हवेलीतील लोणी काळभोर (ता. हवेली) या ठिकाणी मुक्कामास असते. त्यानंतर पुढे उरुळी कांचन येथे दुपारी विसाव्यास येते. मात्र, यंदा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात पालखी थांबणार नसल्याचे हवेलीचे प्रांत अधिकारी आणि सोहळा प्रमुखांनी जाहीर केल्याने येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

पालखी विसाव्याबाबत उरुळी कांचन देवस्थान समिती, श्री काळभैरवनाथ सेवा समिती व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच केले होते. यावेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलिस निरीक्षक सुभाष काळे, पोलिस निरीक्षक किरण धायगुडे, सरपंच राजेंद्र कांचन, देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली कांचन, काळभैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, दत्तात्रेय कांचन, देवस्थान समितीचे विश्वस्त युवराज कांचन, दीपक कांचन, विनोद कांचन, माजी उपसरपंच दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब तुपे, रामभाऊ तुपे, भाऊसाहेब कांचन, सुनील तांबे, गाव कामगार तलाठी सुधीर जायभाय, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विसाव्याबाबत पाच जूनपर्यंत कळविण्याचे आवाहन
संत तुकाराम महाराज पालखी ही सोलापूर महामार्गावरून गावात येण्यासाठी हॉटेल एलाईट चौक ते हॉटेल शैलजा चौक हा दीड किलोमीटरचा टप्पा आहे. याला शासन दरबारी पालखी मार्ग अशा प्रकारची मान्यता दिलेली आहे. यावर शासन दुरुस्ती करत असल्याने हा मार्ग अधिकृतपणाने पालखी सोहळ्याचा मार्ग आहे, या मार्गानेच पालखी सोहळा उरुळी कांचन गावातून मार्गस्थ व्हावा तसेच पालखी विसावा पारंपरिक पद्धतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात व्हावा, अशी भावना ग्रामस्थांनी या बैठकीत व्यक्त केली. तसेच ५ जूनपर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहूच्या पालखी सोहळा प्रमुखांनी ''उरुळी कांचन पालखी विसाव्यास ठेवणार नाही कि ते कळवावे.'' असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा ग्रामस्थ सत्याग्रह, गावबंद, रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.


प्रशासकीय अधिकारी व पालखी सोहळा विश्वस्त यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उरुळी कांचन गावाच्या वतीने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. उरुळी कांचन व पंचक्रोशीतील सुमारे एक लाख लोकांच्या संत तुकाराम महाराज व श्री विठ्ठलाच्या प्रती असलेल्या सद्भावना दुखावल्या जातील. अशा पद्धतीचा निर्णय होऊ नये. पालखी सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याबाबतची दक्षता आम्ही घेणार आहोत.
- दत्तात्रेय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर (ता. हवेली)

00892