
कंटरनेरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
उरुळी कांचन, ता. ७ : उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील साखरे पेट्रोल पंप परिसरात बुधवारी (ता. ७) पहाटे कंटरनेरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. दत्ता दिगंबर मोरे (वय ४५, रा. गोफणी, ता. देवणी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे खासगी आरामदायी बसचे चालक आहेत. ते खासगी बस घेऊन सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी मोरे यांनी उरुळी कांचन येथील हद्दीतील साखरे पेट्रोल पंपासमोर बस थांबविली. बसमधून उतरून मोरे हे रस्ता दुभाजक ओलांडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडे निघाले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला.