‘उत्तर भारतीयांसाठी भवन उभारा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उत्तर भारतीयांसाठी भवन उभारा’
‘उत्तर भारतीयांसाठी भवन उभारा’

‘उत्तर भारतीयांसाठी भवन उभारा’

sakal_logo
By

वडगाव शेरी, ता. १७ ः ‘‘पुण्यात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. याचा विचार करता त्यांच्या उपक्रमांसाठी ‘उत्तर भारतीय भवन’ उभारावे, असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पुणे, पिंपरी -चिंचवड, सांगली जिल्ह्याचे प्रभारी नवीन सिंह यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिले.
नुकतेच कृषिमंत्री तोमर पुण्यात आले होते. या वेळी त्यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. उत्तर भारतीयांच्या औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी ही वास्तू उपयुक्त ठरेल. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे नवीन सिंह यांनी सांगितले.