सुरेश सूर्यवंशी अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश सूर्यवंशी अध्यक्षपदी
सुरेश सूर्यवंशी अध्यक्षपदी

सुरेश सूर्यवंशी अध्यक्षपदी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ६ ः सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील अजित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली. संस्था स्थापनेपासून निवडणूक सभासदांच्या सामोपचाराने बिनविरोध होत असते. यावेळीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष बापूराव सूर्यवंशी, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विनायकराव पिसाळ यांनी सभासदांपुढे प्रस्ताव ठेवला होता. ज्येष्ठांच्या शब्दाला मान देऊन निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यामध्ये सुरेश शंकरराव सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी तर युवराज रामचंद्र पिसाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक विठ्ठलराव भापकर, सदाशिव सूर्यवंशी, बबनराव सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, मुगुटराव होळकर, बापूराव ढोणे, कल्पना पिसाळ, जनाबाई मसाले, बापूराव सूर्यवंशी, विनायकराव पिसाळ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणे यांनी काम पाहिले.


युवराज पिसाळ

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00768 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top