मालमत्ता शाळेची; संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची संरक्षणभिंतीवरून वडगाव निंबाळकरमध्ये शाळा व ग्रामस्थांतील मतभेद तीव्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता शाळेची; संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची

संरक्षणभिंतीवरून वडगाव निंबाळकरमध्ये शाळा व ग्रामस्थांतील मतभेद तीव्र
मालमत्ता शाळेची; संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची संरक्षणभिंतीवरून वडगाव निंबाळकरमध्ये शाळा व ग्रामस्थांतील मतभेद तीव्र

मालमत्ता शाळेची; संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची संरक्षणभिंतीवरून वडगाव निंबाळकरमध्ये शाळा व ग्रामस्थांतील मतभेद तीव्र

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ४ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेची संरक्षणभिंत बांधण्याच्या कारणावरून शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांमधील मतभेद टोकाचे होत आहेत. संरक्षणभिंत बांधताना रस्त्याच्या हद्दीत जाणारी जागा शाळेची असल्याने यासाठी ग्रामपंचायतीने या जागेच्या संरक्षणाबाबत लेखी हमी शाळा प्रशासनाला द्यावी, अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. यामधून ग्रामस्थांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. मालमत्ता शाळेची आणि संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना खटकते.

गावातील विद्यार्थी शाळेत शिकत असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्रामस्थांची भूमिका असते. परंतु, शाळा प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. आम्हाला शाळा इमारत सुधरावयाची आहे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. परंतु, संस्थेच्या आडमुठ्या धोरणामुळे आता शाळेतील विकासकामे थांबली आहेत. आता शाळांमधील स्पर्धा वाढल्या आहेत. अशा स्थितीत संस्थाचालकांचा येथील शाळाच मोडीत काढण्याचा डाव असल्याचा आरोप सरपंच सुनील ढोले यांनी केला.

‘मदत तुमची पण हक्क आमचा’ ही संस्थाचालकांची भूमिका योग्य नव्हे. ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीमुळे शाळा इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शाळेतील बहुतांशी बदल हे देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशातून झाले. ज्या देणगीदारांनी देणगी दिली त्यांची मदत संस्था आणि शाळेला चालते पण त्यांनी सुचवलेले निर्णय मात्र विचारात घ्यायचे नाही, ही संस्था आणि शाळा प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे, असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत खोमणे यांनी व्यक्त केले. या बाबत, मुख्याध्यापक दत्तात्रेय गायकवाड म्हणाले की, संस्थेच्या आदेशाने आम्ही काम करीत असतो. संरक्षणभिंत मागणी करतेवेळी रस्त्याला एवढी जागा जात नव्हती रस्ता रुंदीकरणामुळे हा प्रश्न पुढे आला आहे यावर चर्चेतून मार्ग निघेल.

पालकांनाही घ्या विश्वासात
शाळेचे व्यवस्थापन करताना पालकांना विश्वासात घेतले जात नाही. यामुळे काय चालले आहे तेच कळत नाही. संस्थाचालक फक्त वर्षातून एखादेवेळी येतात. पालकांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यात संस्थाचालक कमी पडत असल्यामुळे असे प्रसंग येत असल्याचे मत पालक जितेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00771 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top