वडगाव निंबाळकरमध्ये कामगाराला धमकावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव निंबाळकरमध्ये 
कामगाराला धमकावले
वडगाव निंबाळकरमध्ये कामगाराला धमकावले

वडगाव निंबाळकरमध्ये कामगाराला धमकावले

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ३ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे कॉंक्रीटीकरणासाठी बंद केलेल्या रस्त्याचे बॅरिकेट तोडल्याचा जाब विचारायला गेलेल्या ग्रामपंचायत कामगारांना शस्त्र दाखवून धमकावण्यात आले. कामगार दिनीच हा प्रकार घडला.
याबाबत ग्रामपंचायतीने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येथील गावठाण भागातील पेठेमध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे हा रस्ता बॅरिकेट लावून रहदारीसाठी बंद केला आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावर ओलावा कायम राखला जावा यासाठी, आळी करून यामध्ये पाणी सोडले आहे. मात्र, रविवारी (ता. १) याच भागात दुकान असलेल्या एका व्यापाऱ्याने बॅरिकेट तोडून मालवाहतुकीचा टेम्पो नवीन रस्त्याने नेला. त्यामुळे नुकतेच केलेले रस्त्याचे नुकसान झाले. याबाबतची माहिती ग्रामपंचायत कामगारांना मिळाल्यावर येथे विचारणा करण्याकरिता गेले असता संबंधित व्यापाऱ्याने कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. कामगारांनी तातडीने सरपंच सुनील ढोले आणि ठेकेदार यांना याबाबत माहिती दिली.
कामगार दिनाच्या दिवशीच कामगारांवर ओढवलेल्या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामपंचायतीने पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. गावात अनेक विकास कामे सुरू आहेत. पण, त्यावर सातत्याने अडथळे आणले जात आहेत. कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे सार्वजनिक कामे करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांकडे केली आहे.
याबाबत सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप माझ्यापर्यंत माहिती आली नाही. चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00772 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top