चोरट्याकडून मुद्देमाल जप्त मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्याकडून 
मुद्देमाल जप्त
मुद्देमाल जप्त
चोरट्याकडून मुद्देमाल जप्त मुद्देमाल जप्त

चोरट्याकडून मुद्देमाल जप्त मुद्देमाल जप्त

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २ : पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी हातचलाखीने लंपास करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलीसांना यश आले. वडगाव निंबाळकर-कोऱ्हाळे मार्गावर एका ज्येष्ठाला १७ फेब्रुवारी रोजी दुपारी पोलिस असल्याची बतावणी करून गळ्यातील सोन्याची साखळी पेंडल काढून रूमालात बांधून ठेवणे सांगितले व त्यानंतर हातचलाखीने सोनसाखळी चोरली होती. याबाबत पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपीच्या वर्णनावरून पोलिसांनी तपास केला. त्यामध्ये आबालु जाफर इराणी (रा. शिवाजीनगर) हा चोरटा असल्याचे निष्पन्न झाले होते. पण तो फरारी होता. त्याला कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी करताना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. कराड पोलिसांनी त्याला वडगावला हस्तांतरित केले. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00785 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top