व्यवसायकर पावती देण्याची वाहनधारकांकडून मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसायकर पावती देण्याची
वाहनधारकांकडून मागणी
व्यवसायकर पावती देण्याची वाहनधारकांकडून मागणी

व्यवसायकर पावती देण्याची वाहनधारकांकडून मागणी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ४ ः वाहन मालकांना व्यवसायकर ऑनलाइन भरण्याची सुविधा केली असली तरी यामध्ये पावती निघत नसल्यामुळे पैसे भरल्याचा पुरावा वाहन मालकांकडे राहत नाही. जीएसटी पोर्टलवर याबाबत योग्य ते बदल व्हावेत, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक व्यावसायिक वाहन मालकाला व्यवसाय कर भरणे सक्तीचे आहे. वाहनानुसार कर आकारला जातो. महा जीएसटी पोर्टलवर पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबरद्वारे रक्कम भरली जाते. पेमेंट केल्यानंतर चलन डाऊनलोड होत नाही परिणामी प्रिंट येत नाही. मग संबंधित मालकाला पैसे भरल्याची खात्री पटवण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते. येथे जीआरएन नंबर दिला जातो. यावरून प्रिंट काढावी लागते. वाहन मालकांना आरटीओ कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगितले जाते. परंतु, सदर प्रक्रियेमुळे हेलपाटे मारण्याची वेळ वाहन मालकांवर आली आहे. संबंधित पोर्टलवर योग्य ते बदल व्हावेत, अशी मागणी वाहन मालकांकडून केली जात आहे. याबाबत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील राजेंद्र केसकर म्हणाले, ‘‘संबंधित कामकाज विक्रीकर विभागाशी संबंधित आहे. वाहन मालकांचे मत विक्रीकर विभागाला कळवले जाईल.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00786 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top