सोपानकाकांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोपानकाकांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी
सोपानकाकांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी

सोपानकाकांच्या पालखी दर्शनासाठी गर्दी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २९ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) परिसरात श्री संत सोपान काका पालखी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोरटेवाडी येथील न्याहारी उरकल्यानंतर पालखी दुपारी दीडच्या सुमारास सदोबाचीवाडी येथे आली. यावेळी सरपंच मनीषा होळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
दुपारचा विसावा आनंद विद्यालयाजवळ झाला. यावेळी वाकी, चोपडज, कानडवाडी, सस्तेवाडी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले. साडेचारच्या सुमारास वडगाव निंबाळकरमध्ये पालखी आली. यावेळेस हरिनामाचा गजर करत भाविकांनी मोठे उत्साहात स्वागत केले. येथील सावतामाळी मंदिरात पालखी थांबली होती. सावता माळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त आणि दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच ऋषिकेश धुमाळ, जमिर शेख, प्रमोद गिते, दीपक होळकर, जगन्नाथ होळकर, अजित पिसाळ, माजी सरपंच विलास होळकर, पोलिस पाटील विजयकुमार लिंबरकर उपस्थित होते. यावेळी रोहिदास हिरवे, दत्तात्रेय गिरमे, दत्ता बनकर, महादेव शिंदे, मधुकर शिंदे, शिवाजी नेवसे उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे चांगली व्यवस्था झाली असे सोहळा प्रमुख त्रिगण गोपाळ गोसावी यांनी सांगितले. सायंकाळी साडेपाच नंतर पालखीने कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) मुक्कामाच्या ठिकाणी प्रस्थान ठेवले.

01457

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00800 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..