फसवणूकप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल
फसवणूकप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

फसवणूकप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १३ ः बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी करत संगनमताने फसवणूक केल्याबाबत चोपडज (ता. बारामती) येथील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत संदीप हनुमंत गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील शिक्षण संस्थेतील रामचंद्र नारायण भंडलकर (वय ६१, रा. चोपडज), पुष्पलता निवृत्ती दिसले (लग्नानंतर नाव - पुष्पलता बाळासाहेब जगताप) रमेश विठ्ठल भोसले (रा. कानाडवाडी, ता. बारामती) व एक अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १८ फेब्रुवारी १९९७ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती, चोपडज (ता. बारामती) येथे हा गुन्हा घडला. यातील भंडलकर व भोसले हे संस्थेतून निवृत्त झाले आहेत. आरोपींनी १८ फेब्रुवारी १९९७ ते २५ एप्रिल १९९७ या कालखंडामध्ये या शाळेत नोकरी केलेली नसताना हजेरीपत्रक, पगारपत्रक, सेवापुस्तकामध्ये खोट्या व बनावट नोंदी तयार करून शासनाची फसवणूक करून एकाच वेळी दोन ठिकाणाहून पगार मिळविला आहे. २५ एप्रिल १९९७ नंतर दिसले यांची यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ, कानाडवाडी या संस्थेची नियुक्ती नसताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची कोणतीही मान्यता नसताना शासनाची फसवणूक करत आजअखेर बोगस नोकरी करत पगार मिळविले आहे. हजेरीपत्रक, पगारपत्रक, सेवापुस्तकामध्ये खोट्या व बनावट नोंदी कागदपत्र तयार करून तसेच बनावट नियुक्तीपत्राद्वारे नोकरी करत संगनमताने फसवणूक केली अशा आशयाचा दावा फिर्यादीने न्यायालयात दाखल केला होता. बारामती न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00808 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..