
कुरणेवाडी येथील रस्त्याची दुरवस्था
वडगाव निंबाळकर, ता. १८ : रिमझिम पावसामुळे खड्डे पडल्याने कुरणेवाडी ते कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कडेने काही दिवसांपूर्वी भूमिगत गटाराची कामे झाली होती. यामध्ये पाइपलाइन खोदताना रस्त्यावर माती आली. यात पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर वरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केली सांगवीकडे जाणारा मधला मार्ग म्हणून अनेक वाहनचालक कुरणेवाडीमार्गे सांगवी कडे जातात त्यामुळे रस्त्यावर सतत रहदारी असते. वितरीकेच्या कडेने गेलेला रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. यामध्ये पावसाची पाणी साठवून डबके तयार झाले आहेत रात्री अपरात्री प्रवास करताना दुचाकीला धोकादायक आहे.
शालेय विद्यार्थी, शेतीमाल वाहतूक करणारी वाहने यांची गैरसोयी लक्षात घेऊन खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागाने त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी सुधीर काळभोर, मनोज काळभोर, सुधीर खराडे, विशाल डांगे, सचिन शेडगे यांनी केली आहे.
01473
Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00809 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..