म्हसोबाचीवाडीत युवकावर हल्ला; तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसोबाचीवाडीत युवकावर हल्ला; तिघांवर गुन्हा
म्हसोबाचीवाडीत युवकावर हल्ला; तिघांवर गुन्हा

म्हसोबाचीवाडीत युवकावर हल्ला; तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २० ः कोर्टातील दाव्याच्या कारणावरून तिघांनी कुऱ्हाडीसह लोखंडी गजाने मारहाण करत युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार म्हसोबाचीवाडी (मानाजीनगर, ता. बारामती) येथे सोमवारी (ता. १८) सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी लोभांश रघुनाथ कोकरे, निशांत प्रशांत घोडके, सुशांत प्रशांत घोडके यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी झालेल्या चेतन रघुनाथ कोकरे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार मानाजीनगर येथे म्हसोबाचीवाडी ते पवईमाळा या रस्त्यावर १७ फाट्यानजीक ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी यांच्यात जुना वाद असून त्याचा दावा न्यायालयात दाखल आहे. या कारणावरून तिघांनी फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी गज, कुऱ्हाडीने फिर्यादीला मारून गंभीर दुखापत करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00813 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top