पावसात रस्त्याचे काम उरकण्याची घाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसात रस्त्याचे काम उरकण्याची घाई
पावसात रस्त्याचे काम उरकण्याची घाई

पावसात रस्त्याचे काम उरकण्याची घाई

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १२ ः सतत पडणाऱ्या पावसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची घाई नीरा-बारामती मार्गावर वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत चालू आहे. कडेची झाडे काढण्यापूर्वीच रस्त्याचे काम केले जात असल्याने नागरिकांमधून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
ढोले वस्तीपासून पोलिस ठाण्यापर्यंत सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. या भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. यामुळे रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. झाडे काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर काम करण्यात येईल, असे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात येत होते. पण गेल्या दहा दिवसांपूर्वी अचानक रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पडत्या पावसात वेगाने काम सुरू आहे. झाडांचा अडथळा होईल अशा ठिकाणी काम तसेच ठेवून मोकळ्या जागेतील काम उरकण्याचा सपाटा सुरू आहे. दीड किलोमीटरमध्ये रस्त्याच्या कामात एकूण चाळीस मोठी झाडे येतात. तोडण्याची परवानगी मिळाल्यावर राहिलेले काम केले जाईल, असे सार्वजनिक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सोमेश्वरनगर वाघळवाडी आणि वडगाव निंबाळकर असे एकूण तीन किलोमीटरच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा प्रशासकीय निधी आहे. यातील चार कोटी चाळीस लाख रुपये निधी मिळाल्याची माहिती देण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दीड मीटर याप्रमाणे तीन मीटरने रस्ता रुंदीकरण होणार आहे.
झाडे काढल्यानंतरच रस्त्याचे काम व्यवस्थित करता आले असते. परंतु, झाडे काढण्यापूर्वीच काम उरकण्याची चाललेली घाई नागरिकांमधून चर्चेचा विषय बनली आहे
याबाबत सरपंच सुनील ढोले म्हणाले, ‘‘नागरिकांनी याबाबत तोंडी तक्रारी ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत. याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय संबंधित कार्यालयाकडे कळवला जाईल.’’
याबाबत बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाची सहाय्यक अभियंता (श्रेणी एक) अमोल पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर शाखा अभियंता खलीद शेख परगावी असल्याने त्यांचा फोन संपर्क क्षेत्राबाहेर सांगत आहे.

1502

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00822 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..