सुपे येथील तरुणाची भीतीमुळे आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे येथील तरुणाची
भीतीमुळे आत्महत्या
सुपे येथील तरुणाची भीतीमुळे आत्महत्या

सुपे येथील तरुणाची भीतीमुळे आत्महत्या

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १४ : चोरांची धास्ती घेतलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे गावात शुक्रवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली. अक्षय सुरेश कदम (वय २८), असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मावस भाऊ शेखर संजय शेलार (रा. पारगाव, ता. दौंड) यांनी पोलिसांकडे खबर दिली. अक्षय हा मजुरीचे काम करतो. गेल्या चार-पाच दिवसात त्याला विचित्र स्वप्न पडत होती. गुरुवारी (ता. १३) दिवसभर तो घरातील सदस्यांना सांगत होता की चोर आले आहेत व मला मारणार आहेत. याबाबत त्याची घरातील लोकांनी समजूत काढली आणि घरातील खोलीत झोपण्यास सांगितले, परंतु त्याच्या मनातून ही बाब गेली नाही. घराची दारे व खिडक्या बंद करून घेतल्या आणि त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत दार उघडली नाही. त्यामुळे सदस्यांनी आत डोकावून पाहिले असता गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
Associated Media Ids VDN22B01519, VDN22B01520

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00828 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..