जय मल्हार दहीहंडी संघाला मानाचा राष्ट्रवादी चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जय मल्हार दहीहंडी संघाला
मानाचा राष्ट्रवादी चषक
जय मल्हार दहीहंडी संघाला मानाचा राष्ट्रवादी चषक

जय मल्हार दहीहंडी संघाला मानाचा राष्ट्रवादी चषक

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ३० ः येथील दहीहंडी उंडवडी कपमधील जय मल्हार दहीहंडी संघाने फोडत मानाचा राष्ट्रवादी चषक व रोख बक्षीस पटकावले. स्वातंत्र विद्यामंदिरच्या प्रांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती. कार्यक्रमासाठी आलेली लहान मुले आणि महिलांसाठी प्रसिद्ध जादूगार शिवम यांचे खेळ ठेवले होते. या वेळी राजे उमाजी नाईक दहीहंडी संघाने सलामी दिली. विजेत्या संघाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धीवार, सनी पाटील, उपसरपंच संगीता शहा, दुर्योधन भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, युवा नेते गौतम काकडे, सुरेश होळकर, अमोल गायकवाड, दत्तात्रेय खोमणे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमनाथ होळकर, अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीत बक्षिस देण्यात आले. आयोजन नानासाहेब मदने यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00840 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..