पावसामुळे बाजरी उत्पादकांची तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे बाजरी उत्पादकांची तारांबळ
पावसामुळे बाजरी उत्पादकांची तारांबळ

पावसामुळे बाजरी उत्पादकांची तारांबळ

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १४ : बाजरीचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांची पावसामुळे पुरती तारांबळ उडल्याचे चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळते. वडगाव निंबाळकर, चोपडज (ता. बारामती) पावसाच्या तावडीतून शेतातील कणसे खुडून कोरड्या जागेत ठेवून वाळवन घालण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे वाया जावून नये यासाठी शेतकऱ्यांची सध्या पराकाष्ठा सुरू आहे.

दररोज येणारा पाऊस बाजरी पिकासाठी अडथळा ठरत आहे. शेतातील ओल हटत नसल्यामुळे उभ्या पिकाची कणसे काढून वाळलेल्या जागेत ठेवली जात आहेत. यातूनही मधून अधून येणारा जोराचा पाऊस मोठी तारांबळ उडवून देतो. कणसे भिजू नयेत यासाठी काळजी घेतली तरच पीक पदरात पडेल. अन्यथा गेल्या तीन महिन्यांचे कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.

वडगाव निंबाळकर मंडल कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण ४२ गावांमधून एक हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड झाली असल्याची माहिती कृषी सहायक रंजित धुमाळ यांनी दिली. यापैकी प्रामुख्याने मुढाळे, ढाकाळे, जळकेवाडी, खामगळवाडी, मोडवे, उंबरवाडी, मोराळवाडी या गावांमधून बाजरीचे पीक घेतले जाते. दरम्यान, पन्नास टक्के बाजरी काढणीचे काम उरकले असल्याची माहिती कृषी सहायक आरती कांबळे यांनी दिली.

जूनच्या दरम्यान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची बाजरी पीक काढून झाली. उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पीक पावसात अडकले आहे. बागायती पट्ट्यातील वडगाव चोपडज परिसरातील जमिनीतील ओलावा कमी होत नाही परिणामी काढणीसाठी अडथळा ठरत आहे. फक्त कोनसे खुडून घरी आणण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे. यामुळे पीक हाताशी येईल.
- दीपक हिरवे, शेतकरी वडगाव निंबाळकर

01557

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00847 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..