सुपे दर्गाच्या विश्‍वस्तांना अतिक्रमणधारकाची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे दर्गाच्या विश्‍वस्तांना
अतिक्रमणधारकाची धमकी
सुपे दर्गाच्या विश्‍वस्तांना अतिक्रमणधारकाची धमकी

सुपे दर्गाच्या विश्‍वस्तांना अतिक्रमणधारकाची धमकी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २१ : दर्गाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून विश्वस्तांना शिवीगाळ व धमकावल्याप्रकरणी दिलावर इस्माईल काझी (रा. सुपे, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सुपे येथील हजरत ख्वाजा शहामन्सुर आरिफ बिल्लाह रहे अलेह या दर्गाचे विश्वस्त इनुस मोहमंदभाई कोतवाल यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दर्गाची जमीन गट नं. ७३मधील २ एकर क्षेत्रामध्ये काझी यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ऊस पीक लावले आहे. मुख्य विश्वस्त म्हणून फिर्यादी हे विचारपूस करावयास गेले असता आरोपीने अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ करून, ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00853 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..