वडगाव निंबाळकर परिसरात अतिवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव निंबाळकर परिसरात अतिवृष्टी
वडगाव निंबाळकर परिसरात अतिवृष्टी

वडगाव निंबाळकर परिसरात अतिवृष्टी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १२ ः बारामती तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाकी तलावातून पाणी ओसंडून वाहत आहे. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी वाकी तलावाची पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांची संवाद साधला.

गेल्यावर्षी तलावाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. चोपडज, वाकी, वडगाव निंबाळकर येथे मोठे नुकसान झाले होते. सुमारे २०० घरांत पाणी शिरले होते, यामुळे यावेळी असे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

मंगळवारी सायंकाळी वडगाव निंबाळकर, वाकी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तलावात सुमारे १५ ओढ्यांचे पाणी येते, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओढ्याला पूर आला आहे. ओढ्या काठच्या रहिवाशांना सतर्क करण्यात येत आहे. दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

चोपडज पोलिस पाटील रवींद्र जगताप, वाकी पोलिस पाटील हनुमंत जगताप यांनी ओढ्याकाठी असलेल्या कुटुंबाला भेट देऊन सावधान केले आहे. दरम्यान, सलग दोन दिवस पाऊस पडल्यास तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊन ओढ्याला पूर येण्याची शक्यता प्रांताधिकाऱ्यांनी यांनी व्यक्त केली.
-------------------

-------------------------------