वडगावातील साळवे यांच्या कुटुंबीयांना पवार यांच्या चार लाखांचा हस्ते धनादेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावातील साळवे यांच्या कुटुंबीयांना पवार यांच्या चार लाखांचा हस्ते धनादेश
वडगावातील साळवे यांच्या कुटुंबीयांना पवार यांच्या चार लाखांचा हस्ते धनादेश

वडगावातील साळवे यांच्या कुटुंबीयांना पवार यांच्या चार लाखांचा हस्ते धनादेश

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २२ : येथील (ता. . बारामती) ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेल्या नरेश म्हस्कू साळवे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आला, अशी माहिती उपसरपंच संगीता शाह यांनी दिली.
साळवे हे ओढा ओलांडताना गुरुवारी (ता. १३) पाय घसरून ओढ्यात पडले व वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी आपत्ती सेल आणि शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील तरुणांनी चौथ्या दिवशी मृतदेह शोधून काढला होता. यावेळी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे तहसीलदार विजय पाटील यांनी साळवे कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार बारामती येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत धनादेश साळवे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अरुणा नरेश साळवे समाधान नरेश साळवे यांचे सांत्वन पवार यांनी केले.

01620