मोरगाव-बारामती मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरगाव-बारामती मार्गावर 
अपघातात तिघांचा मृत्यू
मोरगाव-बारामती मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

मोरगाव-बारामती मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर ता. २८ : मोरगाव-बारामती मार्गावर फोंडवाडा येथे रस्ता ओलांडणारा पादचारी, मोटार आणि दुचाकी यांचा विचित्र अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात पादचारी दशरथ साहेबराव पिसाळ (वय ६३, रा. फोंडवाडा, ता. बारामती), दुचाकीस्वार अतुल गंगाराम राऊत (वय ३२), नंदा गंगाराम राऊत (वय ४८, रा. कऱ्हावागज, ता. बारामती) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून, मोटार चालक आनंदराव विश्वनाथ जगताप (रा. पणदरे, वय ६५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
फोंडवाडा येथे बारामती बाजूकडून आलेली आनंदराव जगताप यांची मोटार (क्र. एमएच १४ केएफ ३४६४) रस्ता ओलांडत असलेल्या पिसाळ यांना जोरात धडकली. त्यावेळी मोटारीवरचा ताबा सुटल्यामुळे समोरून मोरगाव बाजूकडून आलेल्या दुचाकीला (क्र. एमएच ४२ एडब्ल्यू १४०३) धडकली. या अपघातात पिसाळ, अतुल राऊत व नंदा राऊत या तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती फौजदार सलीम शेख यांनी दिली.