वडगावात गुणवत्ता युक्त भाजीपाला निर्मितीसाठी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात गुणवत्ता युक्त भाजीपाला निर्मितीसाठी बैठक
वडगावात गुणवत्ता युक्त भाजीपाला निर्मितीसाठी बैठक

वडगावात गुणवत्ता युक्त भाजीपाला निर्मितीसाठी बैठक

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १८ : येथे (ता. बारामती) कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता युक्त भाजीपाला निर्मितीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी श्रीदत्त फलोत्पादन सहकारी संस्थेच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली.
कृषी विज्ञान केंद्राचे यशवंत जगदाळे तुषार जाधव यांनी केंद्रामार्फत राबवल्या जाणाऱ्या इंडो डच प्रकल्पांतर्गत भाजीपाला कलम रोपे आदर्श भाजीपाला उत्पादन कृती आराखडा याविषयी मार्गदर्शन केले उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी या प्रकल्पात राबविण्याचे कृषी विभागाचे विविध बाबी आणि त्यात असणारे अनुदान विविध योजना यांची माहिती दिली. यावेळी सरपंच सुनील ढोले, उपसरपंच संगीता शहा फलोत्पादन संघाचे अध्यक्ष मिलिंद बोकील प्रगतशील शेतकरी मारुती पानसरे शंकर शिंदे यांच्यासह शेतकरी कृषी सहायक रंजित धुमाळ उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी आभार मानले.

01634