बोगस रेशनकार्ड काढून फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस रेशनकार्ड काढून फसवणूक
करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा
बोगस रेशनकार्ड काढून फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

बोगस रेशनकार्ड काढून फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ३१ ः एकत्र कुटुंबाचे रेशन कार्डमध्ये नाव असताना स्वतःचे दुसरे बोगस रेशन कार्ड काढून रेशनचे धान्य घेत शासनाची फसवणूक केल्याबद्दल बारामती तहसीलदारांच्या आदेशाने संदीप धनंजय भोसले (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप करण्यात आलेल्या संदीप यांनी वडिलांच्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असताना तेथील नाव कमी न करता बेकायदेशीर मार्गाने दुसरे बोगस केशरी रेशनकार्ड काढत त्याद्वारे शासकीय धान्य घेत शासनाची फसवणूक केली. चोपडजमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप हनुमंत गाडेकर यांनी भोसले यांच्या बोगस रेशनकार्डाबाबत बारामतीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली. संदीप भोसले हे कानाडवाडीचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील धनंजय जयसिंग भोसले यांच्या नावे रेशनकार्ड असून त्यात संदीप यांचे नाव समाविष्ट आहे. ते कमी न करता त्यांनी तहसील कार्यालयात जात पत्नी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत चोपडज मनिषा संदीप भोसले यांच्या नावे केशरी रेशनकार्ड मिळविले. त्याद्वारे शासनाकडून धान्य घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत चोपडजचे तलाठी अश्पाक हनिफ इनामदार (रा. मुरूम, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.