Mon, Feb 6, 2023

ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
Published on : 3 January 2023, 2:03 am
वडगाव निंबाळकर, ता. ३ : चोपडज (ता. बारामती) येथे आज (ता. ३) सकाळी आकराच्या वाजता दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्या अपघात झाला. यात शौर्य चेतन काळे (वय ५) या
लहान मुलाचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला. याबाबत ट्रॅक्टर चालक दत्तात्रेय ऊर्फ रोहन रवींद्र साळवे (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडज बाजूकडून वाकी गावच्या दिशेने ट्रॅक्टर जात असताना बाजूने चाललेली दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. यामुळे दुचाकीवर आई-वडिलांसमवेत बसलेला लहान मुलगा शौर्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला.