भाजप तालुका उपाध्यक्षपदी अमोल प्रभुणे

भाजप तालुका उपाध्यक्षपदी अमोल प्रभुणे

वडगाव निंबाळकर, ता. १७ : मुढाळे (ता. बारामती) येथील अमोल अविनाश प्रभुणे यांची भाजप बारामती तालुका मंडलच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या स्वाक्षरीने नुकतेच बारामती येथील पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, बाळासाहेब भेगडे बारामती शहर अध्यक्ष सतीश फाळके, अविनाश मोटे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, आकाश कांबळे उपस्थित होते. प्रभुणे यांचा बारामती तालुक्यातील पश्चिम भागात चांगला लोकसंपर्क आहे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे काम तत्त्वनिष्ठने करीत आहेत. यापूर्वी सोपवलेली जबाबदारी आणि केलेले काम विचारात घेऊन पक्षाने नव्याने जबाबदारी दिली आहे.


01729

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com