कोऱ्हाळे येथे वनसंपदा आगीत नष्ट

कोऱ्हाळे येथे वनसंपदा आगीत नष्ट

वडगाव निंबाळकर, ता. २५ : कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) येथील वन क्षेत्राला गुरुवारी (ता. २३) दुपारी आग लागली. यामुळे वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील पर्यावरण प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बारामती तालुक्यात वन विभागातील क्षेत्राला आग लागण्याच्या घटना वाढत आहेत यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन वनविभागाने संबंधित ठिकाणी जाळपट्ट्या (फायर लाईन) तयार केल्या नाहीत परिणामी आग वाढत गेली. जाळपट्ट्या असत्या तर ठराविक अंतरावर आग विझली असती. परंतु उपाययोजना नसल्यामुळे आगीचे तांडव वाढत गेले. भर दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. ग्रामस्थांनी वन विभागाला कळविल्यानंतरही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले थोपटेवाडी गावातील काही तरुण आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु याला फारसे यश आले नाही.

काही ग्रामस्थांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला व यानंतर वनविभागाचे वनरक्षक योगेश कोकाटे, वन कर्मचारी नंदलाल गायकवाड, जयराम जगताप, अविनाश नाईक, सचिन काळे, विशाल खोमणे, नवनाथ रासकर, योगेश कदम, या वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. वनविभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते पाइपलाइन अडवण्यासाठी वनाधिकारी तत्पर असतात. परंतु एखादी आग लागण्यासारखी गंभीर घटना झाल्यावर मात्र तत्परता दाखवली जात नाही. याबद्दल काही ग्रामस्थांनी खेद व्यक्त केला.

संबंधित ठिकाणी जाळपट्ट्या काढल्या होत्या. एकाच वेळी अनेक ठिकाणी आग लावली. आग लावण्याचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला कळवावे.
- शुभांगी लोणकर, वनाधिकारी बारामती तालुका

01774

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com