कुरणेवाडीत रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरणेवाडीत रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी
कुरणेवाडीत रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

कुरणेवाडीत रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २ : कुरणेवाडी (ता. बारामती) येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेते कित्येक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न सहमतीतून मार्गी लावला व कामाला नुकतीच सुरुवात केली. पणदरे खिंड ते खडकवस्ती हा अडीच किलोमीटर हा वादातील रस्ता तयार केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा दिली त्यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक पंचक्रोशीत होत आहे.

एका बाजूला वनविभाग तर दुसऱ्या बाजूने शेतकरी असल्यामुळे नक्की जागा द्यायची कुणी हा प्रश्न ऐरणीवर होता. यावर अनेकदा चर्चा होऊनही तोडगा निघत नव्हता. रस्ता मंजूर होऊन सुमारे चार ते पाच वर्ष पूर्ण झाली होती. अखेर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी जागा देणाऱ्या त्या शेतकऱ्यांना आपण देत असलेल्या दातृत्वाचे मोल अमोल आहे. स्थानिक रहिवासी कायम आपले नाव काढतील, अशी भावनिक साद घातली आणि याला यश आले. शेतकऱ्यांनी आपल्या जागेतून रस्ता देत प्रश्न मार्गी लावला. नवीन रस्ता करणे करिता नऊ शेतकरी कुटुंबांची १३२ गुंठे जागा देण्याची तयारी दाखवली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या पणदरे खिंड ते खडकवस्ती-सगोबावाडी या रस्त्याचे भूमिपूजन मोहन जगताप यांचे हस्ते पार पडले यावेळी सरपंच आशा किसनराव काळभोर, प्रा. हिराचंद काळभोर, प्रताप जगताप, रायचंद जगताप, सुरेश जगताप, भरत जगताप, विजय घोरपडे, बाळासाहेब मदने, बाळासाहेब सोलनकर, सुरेश थोरात, मोहन माने, अजित जगताप, नंदकुमार माने, प्रकाश काळभोर, सुभाष भोईटे, प्रकाश भोईटे, बाळासाहेब धायगुडे, संजय जगताप, कुमार इंगळे, नानासाहेब मदने, बापू जगताप, चंद्रकांत माने, दत्तात्रेय यशवंत काळभोर, प्रा. नितीन शिंदे, सचिन काळभोर, गणेश काळभोर, दीपक डांगे, महादेव शिंदे, राजवर्धन जगताप, संग्राम शिंदे, पप्पू धुमाळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजने चे अभियंता नितीन शेडगे यांच्या उपस्थितीत होते.

ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम केले तर निश्चित यश येते याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. सार्वजनिक समस्यांवर उपाय योजनेसाठी सहकार्याची भूमिका प्रत्येकाने ठेवावी.
-आशा काळभोर, सरपंच

01784