कोऱ्हाळे येथे आढळला विहिरीत मजुराचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोऱ्हाळे येथे आढळला 
विहिरीत मजुराचा मृतदेह
कोऱ्हाळे येथे आढळला विहिरीत मजुराचा मृतदेह

कोऱ्हाळे येथे आढळला विहिरीत मजुराचा मृतदेह

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १९ : कोऱ्हाळे बुद्रक (ता. बारामती) येथे एका विहिरीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत शेतमजुराचा मृतदेह आढळून आला. खूनाचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुनील राजाभाऊ वाबळे (वय ५०, रा. मुढाळे, ता. बारामती) असे मृत शेतमजुराचा नाव असून, गेली अनेक वर्षे येथील डॉ. अरविंद खोमणे यांच्याकडे शेतात कामगार म्हणून ते काम करतात. शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांचा मुलगा गणेश हा जेवणाचा डबा घेऊन आला असताना त्याला आपल्या वडिलांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने हा खुनाचाच प्रकार असल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृतदेहाच्या अंगावरती कोणत्याही खुणा नाहीत. त्यामुळे मृत्यूचे गूढ वाढले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गणेश सुनील वाबळे यांनी फिर्याद नोंदवली आहे, अशी माहिती वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी दिली.