Wed, June 7, 2023

सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Published on : 26 March 2023, 12:56 pm
वडगाव निंबाळकर, ता. २६ ः ग्रामसेविकेशी गैरवर्तन करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दत्तात्रेय मारुती ढमे (रा. नारोळी ता. बारामती) याच्यावर नोंदवण्यात आला आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (ता. २३) नारोळी गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्तात्रेय याने जुन्या बांधलेल्या गाईच्या गोठ्याचे मस्टर काढण्यावरून फिर्यादीस दमदाटी केली. फिर्यादी सरकारी काम करीत असताना ऑफिसचे दप्तर ओढून सरकारी काम करून दिले नाही. गैरवर्तन केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास फौजदार सलीम शेख करीत आहेत.