सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट
सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट

सिमेंट रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. ३० : येथील (ता. बारामती) वेताळनगर भागात चाललेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षभरापासून रस्त्याचा प्रश्न रेंगाळत आहे. तीन महिन्यापूर्वी काम सुरू झाले; परंतु रस्ता रुंदवण्याच्या कारणावरून मतभेद झाल्यामुळे काम सुरू झाले नाही. अखेर सरपंच सुनील ढोले आणि सदस्य मंडळांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. रस्त्याला अडथळा ठरणारा भाग काढण्याचे एकमताने ठरल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने सुमार दर्जाचे काम करायला सुरुवात केली. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आक्षेप ग्रामस्थांचा आहे काम सुरू होण्यापूर्वी सदर ठिकाणी कामाच्या माहितीचा फलक लावणे गरजेचे होते. याबाबत पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी तक्रारही ग्रामस्थांनी केली होती. परंतु ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत काम सुरू ठेवले परिणामी ग्रामस्थांना कामाविषयी कोणतीच माहिती नव्हती, अखेर काही सुज्ञ नागरिकांनी अंदाजपत्रक तपासल्यानंतर सुमार दर्जाचे काम होत असल्याचे लक्षात आले. नीरा बारामती मार्गापासून गावठाण भागात बाजार तळ आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे गावातील हा महत्त्वाचा रस्ता समजला जातो. यामुळे इस्टिमेटप्रमाणे काम व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नागरी सुविधा योजनेतून सदर कामासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा ८१ मीटर लांबी आणि पाच मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट रस्ता आहे.
- सुहास लडकत, शाखाधिकारी, बांधकाम विभाग, पंचायत समिती

रस्त्याच्या कामाविषयी ग्रामविकास अधिकारी अनभिज्ञ आहेत या कामाचे इस्टिमेट ग्रामपंचायत कार्यालयाकडे नसल्यामुळे याबाबतची माहिती उपलब्ध नाही.
- अनिल हिरासकर, ग्रामविकास अधिकारी

01816