शेअर मार्केटच्या आमिषाने
४० लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटच्या आमिषाने ४० लाख रुपयांची फसवणूक

वडगाव निंबाळकर, ता. ८ : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर चांगला नफा होईल, असे सांगून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत विनय पुरुषोत्तम वर्टी (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याबाबत हेरंब दिगंबर सासवडे (रा. मोरगाव, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. आपला भांडी विक्रीचा व्यवसाय कोरोना कालावधीत मंदावला असल्यामुळे फिर्यादी जवळच्या नातेवाइकाकडे गेली असता त्यांच्या संबंधातील आरोपी व्यक्ती विनय वर्टी यांना भेटले. त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगितले. त्यामुळे पैसे गुंतविण्यासाठी सासवडे यांनी मयुरेश्वर पतसंस्थेला घर गहाण ठेवून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी प्रत्येकी १५ लाखांचे दोन चेक, ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे व अन्य रक्कम वर्टी यांना रोखीने दिली. त्यानंतर महिनाभराने फिर्यादीने वर्टी यांची भेट घेतली असता त्यांनी दोन लाख रुपयांचे दोन चेक दिले. ते चेक फिर्यादीने भरले असता पुरेशी रक्कम नसल्याने वटले नाहीत. वर्टी यांना संपर्क केला असता त्यांनी खोपोलीत येण्यास सांगितले. तेथे पुन्हा जात फिर्यादीने भेट घेतली असता ४ लाख रुपयांचा चेक त्यांना देण्यात आला. तो खात्यावर भरल्यावर बाऊन्स झाला. त्यानंतर वर्टी यांचा संपर्क बंद झाला. शिरिष बिवरे व अन्य लोकांनी संपर्क केला असता त्यांनीही वर्टी कुठे आहेत, हे माहीत नसल्याचे सांगितले. वर्टी हे भेटत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com