विहिरीमध्ये अडकलेल्या मोरास मुढाळेतील तरुणाकडून जीवदान

विहिरीमध्ये अडकलेल्या मोरास मुढाळेतील तरुणाकडून जीवदान

वडगाव निंबाळकर ता. ३० : मुढाळे (ता. बारामती) येथील जायपत्रेवाडी भागात विहिरीत पडलेल्या मोराला तरुणांनी जीवदान दिले. येथील सुनील जायपत्रे यांच्या शेतातातील विहिरीत चार ते पाच किलो वजनाचा मोर मंगळवारी (ता. ३०) सकाळी सात ते आठच्या सुमारास पडला होता. मोरास बाहेर काढून पक्षिप्रेमी तरुणांनी त्यास अधिवासात सोडण्यात आले.

मिलिंद सदाशिव जायपत्रे, सचिन सुनील जायपत्रे हे दोघेजण शेताला पाणी देण्यासाठी निघाले होते. त्यावेळी विहिरीतून फडफडणारा आवाज ऐकून येताच त्यांनी डोकावून पाहिले. अडकलेल्या मोराची अवस्था पाहून दोघांनीही विहिरीत उतरून अलगद मोरास पाण्याबाहेर काढत शेजारील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणांनी दाखवलेले प्राणी प्रेम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.


01902

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com