हिंगणगाव सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणगाव सोसायटीवर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा
हिंगणगाव सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

हिंगणगाव सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

sakal_logo
By

वडापुरी, ता. ६ : इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून, या सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली आहे. त्यातून ॲड. राजेंद्र तांबिले यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
हिंगणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी तालुक्यात एक अग्रेसर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये कै. रंगनाथदादा तांबिले व कै. मारुती विष्णू तांबिले यांनी केली. तेव्हापासून गेली सत्तर वर्ष सर्वच निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. तीच परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. राजेंद्र तांबिले, छगन तांबिले, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या प्रयत्नांतून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२२ ते सन २०२७ साठीही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बंडगर व सचिव मुजीब शेख यांनी काम पाहिले आहे.

निवडून आलेले सदस्य- राजेंद्र मारुती तांबिले, अनंता दिगंबर देवकर, दादासाहेब गोवर्धन देवकर, हरिश्‍चंद्र साहेबराव पाटील, ऋषिकेश राजेंद्र देवकर, प्रकाश विश्वास खटके, समाधान रवींद्र तांबिले, बाळासाहेब रामा खराडे, सोनाली ज्योतिर्लिंग तांबिले, विद्या श्रीमंत खबाले, अभिजित राजेंद्र तांबिले, धुळा राजाराम चोरमले, ज्ञानदेव जनार्दन जगताप.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01586 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top