
इंदापुरात कोट्यवधींची कामे प्रगतिपथावर ः भरणे
वडापुरी, ता. ७ : इंदापूर तालुक्यात सध्या कोट्यवधी रुपयांच्या विकासनिधीतून कामे सुरू आहेत. यापुढेही विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
सुरवड (ता. इंदापूर) येथे ४५ कोटी ४३ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. विरोधकांनी कधी लाखो रुपयांचा निधी आणून गावाचा विकास केला का, असा सवाल यावेळी भरणे यांनी केला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित तांबिले, माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सागर मिसाळ, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, बाळासाहेब करगळ, सरपंच योगिता शिंदे, दीपक जाधव, बापूराव शेंडे, तानाजी हांगे, दत्तात्रेय तोरसकर, बाळासहेब भोसले, रमेश कोरटकर, हनुमंत जगताप, केशव सुर्वे आदी उपस्थित होते.
विरोधकांवर टीका
गावातील बंधारा शरद पवार यांच्यामुळे झाला परंतु त्याचे श्रेय विरोधकांनी घेतले. वीस वर्षे मंत्री पद भोगले पण या गावासाठी काही सुद्धा केले नाही, अशी टीका प्रदीप गारटकर यांनी केली. गावाचा कायापालट पवार कुटुंब व भरणे हेच करू शकतात, असेही गारटकर म्हणाले.
VDP22B01501
Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01587 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..