हिंगणगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. तांबिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. तांबिले
हिंगणगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. तांबिले

हिंगणगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. तांबिले

sakal_logo
By

वडापुरी, ता. १२ : हिंगणगाव (ता. इंदापूर ) येथील हिंगणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड.राजेंद्र तांबिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब बंडगर यांनी काम पाहिले. यावेळी सोसायटीचे सचिव मुजीब शेख उपस्थित होते.
निवडीनंतर तांबिले म्हणाले कि, हिंगणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी इंदापूर तालुक्यात नावाजलेली सोसायटी आहे,त्यामुळे सोसायटी मध्ये काम करत असताना सर्व संचालक मंडळ व शेतकऱ्यांना सोबत घेऊनच काम केले जाईल. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे तांबिले यांनी सांगितले. दरम्यान, सोसायटीत नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


01505

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01591 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top