
आदर्श शिक्षक पुरस्काराने ताहेर शेख यांचा सन्मान
वडापुरी, ता. १४: दत्तवाडी (काटी,ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ताहेर शेख यांना राज्यस्तरीय लोकशाहीर अमर शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्यिक, कादंबरीकार, चित्रपट कथा लेखक राजन खान यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ताहेर शेख यांची आदर्श शिक्षक, तंत्रस्नेही, उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय, शिक्षक पतसंस्थेच्या सहसचिव म्हणून काम करत आहेत. भीमा नीरा विकास संस्था व विश्वभारती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलीम शेख यांनी पुरस्काराचे आयोजन केले होते. हा पुरस्कार वितरण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण अकरा सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था अशा विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सलीम शेख, प्रमुख पाहुणे राजन खान, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा, कैलास कदम उपस्थित होते.
01532
Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01615 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..