''१०० टन ऊस उत्पादनासाठी पंचसुत्री वापरा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''१०० टन ऊस उत्पादनासाठी पंचसुत्री वापरा''
''१०० टन ऊस उत्पादनासाठी पंचसुत्री वापरा''

''१०० टन ऊस उत्पादनासाठी पंचसुत्री वापरा''

sakal_logo
By

वडापुरी, ता. २५ : ''''शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व पंचसुत्रीचा अवलंब करा,'''' असे आवाहन बावड्याचे मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी जी.पी.कृषी अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे २५ जून ते १ जुलै हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून वडापुरी (ता. इंदापूर) येथील फडतरेवस्ती येथे कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात येते. कृषी विभागातील विविध योजना, विविध खरीप पिके, फळपिके यांचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे बांधावर पोहचविणेसाठी या सप्ताहाचे औचित्य साधले आहे. इंदापुरात तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडल कृषी अधिकारी इंदापूर, बावडा, सणसर व भिगवण यांचे कार्यक्षेत्रात सप्ताहात गावोगावी एकरी शंभर टन उत्पादन, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया योजनेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करणे आदींबाबत मार्गदर्शन केले.

विनायक बाब्रस यांनी जांभुळ लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन याविषयी बहाडोली जांभुळ बागेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ठिबक सिंचनासाठी अनुदान प्रक्रिया व महाडीबीटी योजनेतील घटक व निवड, कागदपत्रे अपलोड करणे याविषयी कृषी सहाय्यक महेश वाघ व अतुल जावळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार फडतरे, सतीश फडतरे, प्रमोद फडतरे कृषी पर्यवेक्षक शिंगटे आर.एस, सी.एस भुजबळ व शेतकरी उपस्थित होते.


वडापुरी (ता. इंदापूर) : कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांना बियाणे वाटप करताना कृषी अधिकारी.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01629 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top