आतषबाजीकरत पालखीचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आतषबाजीकरत पालखीचे स्वागत
आतषबाजीकरत पालखीचे स्वागत

आतषबाजीकरत पालखीचे स्वागत

sakal_logo
By

वडापुरी, ता. १७ : वडापुरी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर अकलूज चौकातील अवसरी रस्त्यावर फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी दर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील भाविकांनी गर्दी केली होती.
वडापुरी येथे गेल्या ३६ वर्षापासून तुकाराम महाराजांची पालखी निवृत्ती जनार्दन थोरात व थोरात बंधू यांच्या घरी मुक्कामी असून ते अखंडपणे सेवा करत आहेत. थोरात यांच्यावतीने चहा, नाश्ता, जेवण आदींची दोन दिवस सोय केली जाते.
पालखी मुक्कामी आल्यानंतर रात्री आरती, कीर्तन, भजन, जागर झाले. काकड आरती व महापूजा झाल्यानंतर पालखी इंदापूरकडे मार्गस्थ झाली. या वेळी दर्शनासाठी अवसरी, बेडसिंग भांडगाव, बाभूळगाव, हिंगणगाव, इंदापूर, काटी, रेडा, रेडनी, पंधारवाडी इत्यादी ठिकाणचे भाविक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01659 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..