वडापुरीत चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडापुरीत चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वडापुरीत चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वडापुरीत चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

वडापुरी, ता. १० : येथील (ता.इंदापूर) श्रीनाथ मंदिरात शेतकऱ्यांसाठी स्मार्ट (स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत मूल्यसाखळी विकास विषयी डाळिंब शेतीशाळेचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
बावड्याचे मंडळ कृषी अधिकारी जी.पी. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, कंपनी व सभासद शेतकरी यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादन करणेसाठी डाळिंब लागवड, कीड, रोग नियंत्रण व व्यवस्थापन याबाबत माहिती देऊन दिवसेंदिवस डाळिंब उत्पादक शेतकरी यांना हवामान बदलामुळे भेडसावत असणाऱ्या समस्या डाळिंबावरील तेलकट डाग, पिन होल बोरर, यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहेत
तसेच कोणत्याही प्रायवेट डाळाींब डॉक्टर व कृषी सेवा केंद्र यांचेवर अवलंबून न राहता कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून डाळिंब कीड, रोग याविषयी मार्गदर्शन घेऊन उत्पादन खर्च कमी करणेचे आवाहन केले.
इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादन करणारे शेतकरी यांचेसाठी पायाभूत सुविधा पुरवून त्यांना मूल्यवर्धन, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व विक्रीसाठी उत्पादक ते खरेदीदार यांची साखळी निर्माण करणे साठी अन्सेसट्रल फार्मस प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे, अशी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक अतुल जावळे व तालुका तंत्र व्यवस्थापक (आत्मा) विजय बोडके यांनी केले होते. या कार्यक्रमास स्मार्ट प्रकल्पाच्या सल्लागार जोती भालके, हनुमंत जगताप, प्रताप बागल,
कल्याण देवकर, तानाजी पिंगळे, बापू रणवरे, नारायण पवार, तात्या भोसले सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
01613

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01673 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..