वडापुरीत शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे वाटप वडापुरी शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्याचे वाटप. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडापुरीत शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे वाटप
वडापुरी शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्याचे वाटप.
वडापुरीत शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे वाटप वडापुरी शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्याचे वाटप.

वडापुरीत शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे वाटप वडापुरी शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्याचे वाटप.

sakal_logo
By

वडापुरी, ता. ८ : येथील (ता. इंदापूर) शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत इंदापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने ज्वारीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ज्वारीच्या मशागत व व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.

वडापुरीतील श्रीनाथ मंदिरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रूपनवर म्हणाले कि, शेतकऱ्यांनी पूर्व मशागत सुधारित वाण, पेरणी अंतर व एकात्मिक अन्नधान्य व्यवस्थापन योग्य रित्या केले पाहिजे, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा रब्बी हंगामातील ज्वारी पिक घेत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य माहिती घेऊन पिकाचे नियोजन करावे.
तसेच कृषी योजनांचे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक शिंगटे व ए. एल. जावळे कृषी सहायक यांनी केले.
जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ज्वारी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन कृषी अधिकारी सूर्यवंशी यांनी केले. यावेळी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01655